भय्युजी महाराजांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन.


अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. भय्यूजी यांनी स्वत:वरगोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला आहे. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जातात. गुजरात मधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. मराठा आरक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post