इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परिक्षेत लोहारा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख या उत्तीर्ण झाल्या आहेत.यांची सहायक विक्रीकर आयुक्तपदी (गट-अ) म्हणुन निवड झाली आहे.
महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षेचा निकाल दि. 30 मे रोजी जाहिर झाला आहे.या परिक्षेत सोनम देशमुख उत्तीर्ण झाल्या आहेत.
श्रीमती सोनम देशमुख यांची महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गतच मुख्याधिकारी म्हणून पहिली नियुक्ती लोहारा शहरात झाली होती.मात्र वरिष्ठ अधिकारी होण्याची जिद्द व ध्येय समोर ठेवुन त्यांनी लोहारा शहरातील मुख्याधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी परिक्षेची तयारी केली.त्या पहिल्याच परिक्षेत उत्तीर्ण झाल्या.त्यांची साहयक विक्रीकर आयुक्तपदी (गट-अ) निवड झाली आहे.यांचे परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
