इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सर्वच आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे मानधन गेल्या एक ते दिड वर्षांपासून थकीत आहे.तरी हे मानधन देण्यात यावे,अशी मागणी
लोहारा तालुक्यातील संगणक परिचालकांनी निवेदनाद्वारे गटविकारी क्रांती बोराटे यांच्याकडे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्र शासनाने
डिजिटल महाराष्ट्र करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना केली खरी पण डिजिटल
करणाऱ्यानाच उपाशी ठेवले.अनेकांना कोरड्या आशेवर ठेवून कामे करवून घेतली जातात,परंतु अद्यापपर्यंत कोणाचेही मानधन दिले नाही.दि.29 मे रोजीच्या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
हे परिचालक 2011 पासून कार्यरत आहेत.यांना दिड वर्षांपासून मानधन दिले नाही.याउलट अनेक ग्रामपंचायतीकडून केंद्र चालकांच्या नावाखाली लाखो रुपये जिल्हा परिषदच्या आपले सरकार सेवा केंद्राकडे जमा करून घेतले.आणि केंद्र चालकांना उपाशी ठेवले.इतर जिल्ह्यांचे माहे मार्च 2018 पर्यंतचे मानधन झाले आहे,फक्त उस्मानाबाद जिल्ह्याचेच मानधन रखडले आहे,ते का रखडले आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे,असे केंद्र चालकांचे म्हणने आहे. बऱ्याच केंद्र चालकांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून अनेकांचे लग्न झाले आहे.आणि कुटुंबकर्ते पण केंद्र चालकच आहेत.कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा अत्यंत गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.बरेचजण वयाची पस्तिशी ओलांडली आहेत, शासनाने त्यांना फक्त आश्वासने दिली आहेत.यावर गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांना विचारणा केली असता त्यांनी तो प्रश्न जिल्हयाला पाठवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवते असे बोलले,आणि जिल्हा व्यवस्थापकाला विचारले असता दोन ते चार दिवसात हा प्रश्न सुटेल असे त्यांनी सांगितले.परिचालकांनी त्यांना चार ते पाच दिवसांची मुदत दिली आहे,अन्यथा जि.प.समोर संपूर्ण जिल्ह्यातील संगणक परिचालक उपोषणाला बसतील असेही सांगीतले आहे.या निवेदनावर सिद्धेश्वर स्वामी, कृष्णा गोरे,प्रवीण मुगळे,दयानंद स्वामी,किरण चिंचोळे,नागेश फुलसुंदर,गणेश कारभारी,गणेश डोंगरे,किशोर जगताप,त्रिशाला मुगळे,अमोल कांबळे, मनीषा चाकुरे,आदींसह लोहारा तालुक्यातील सर्व परिचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
