देशात धर्मांध राजकारणाला उत आला आहे — सामाजिक कार्यकर्ते अशोक सरवदे


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
 देशात धर्मांध राजकारणाला उत आला आहे.त्यामुळे देशाच्या अखंडतेला व राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे.परिणामी भारताचे संविधान धोक्यात येत आहे.संविधानाचा बचाव करण्यासाठी बहुजन समाजाने एत्र यावे,असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा शाहु शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक सरवदे यांनी केले.
    लोहारा शहरातील स्प्तरंग मंगल कार्यालयात दि.29 मे रोजी दुपारी एक वाजता मांतग समाजाच्या वतीने  भारतीय संविधान बचाव परिषद आयोजित करण्यात आली होती.या संविधान बचाव परिषदेचे उदघाटन करुन ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद थोरात होते.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आसिफ मुल्ला,सतिश कसबे,दत्ता गायकवाड,पांडुरंग बगाडे,प्रा.डॉ.रमेश पात्रे,संजय सरवदे,सुखदेव  होळीकर,विष्णूपंत खंडागळे,शिवाजी दुनगे,बबन बनसोडे,दिलीप गायकवाड,डॉ.चंद्रशेखर गायकवाड, विष्णुपंत खंडागळे,कमलाकर सिरसाट,दीपक वैशाख रोडगे,सुखदेव रोडगे,अदि उपस्थित होते.यावेळी अशोक सरवदे पुढे बोलताना म्हणाले की,संविधानात न्यायव्यवस्थाही सर्वोच्यस्थानी आहे.परंतु या  न्यायव्यवस्थेलाच जनतेच्या दरबारात न्याय मागावे लागत आहे.अशी परीस्थिती गेले साठ वर्षात देशात कधीच आली नाही.असे सांगत एका विशिष्ट वर्गाकडून धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने देश अराजकतेच्या वाटेवर उभा आहे. देशाला एक संघ बांधून ठेवणारे व सर्व नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क देणारे भारतीय संविधान बदलून पुन्हा जातीय व्यवस्था निर्माण करण्याच  प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे देशाची एकात्मता टिकवून ठेवण्याची जबाबदारी सृजनशील नागरिकांवर आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला,डॉ.रमेश पात्रे,दत्ता  गायकवाड,सतिश कसबे,अदिंनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रावसाहेब सरवदे व सूत्रसंचलन केशव सरवदे व महादेव वाघमारे यांनी केले.तर आभार केशव सरवदे यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कविता सरवदे,जया थोरात,दिपक प्रकाश रोडगे, सुखदेव रोडगे,कैलास पाटोळे,विशाल गायकवाड, बालाजी गायकवाड,बालाजी शिंदे,किसन सरवदे, शेषेराव सरवदे,राजू इंडे,साहिल मुल्ला,प्रकाश चव्हाण यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post