मुद्रा आणि पिक कर्जाचे टारगेट पुर्ण करा खासदार भावनाताई गवळी यांचे बॅंक अधिका-यांना निर्देश

बॅंक व्यवस्थापकांच्या बैठकीत आढावा घेतांना खासदार भावनाताई गवळी

मक़सूद अली 
प्रतिनिधी यवतमाळ  :- केंन्द्र सरकारने  बेरोजगार युवकांसाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाचा  पुरवठा तसेच  शेतक-यांच्या  पिक कर्जाचे टारगेट वेळेत पुर्ण करा असे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी दिले यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राष्ट्रीय बॅंकेच्या व्यवस्थापकांची आढावा बैठक घेण्यात आली


  • या बैठकीत त्यांनी या सुचना दिल्या. 

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्टेट बॅंक ऑफ इंडीया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सीस, एचडीएफसी सह जवळपास वीस राष्ट्रीय बॅकेचे व्यवस्थापक उपस्थित होते या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंन्द्र फुलझेले, अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक श्री कुमरे, प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड, निवासी उप जिल्हाप्रमुख प्रविण पांडे, तालुका प्रमुख किशोर इंगळे, संजय रंगे, शहर प्रमुख पिंटु बांगर, अमोल धोपेकर, प्रसाद अवसरे उपस्थित होते. मुद्रा योजनेअंतर्गत बॅंकांना किती टारगेट होते तसेच त्यांनी किती टारगेट पुर्ण केले याचा आढावा खासदार भावनाताई गवळी यांनी घेतला. अनेकांनी आपले टारगेट पुर्ण न केल्यामुळे त्यांना एका महिण्याच्या आत टारगेट पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. बॅकेंच्या अंतर्गत येणा-या गावांची यादी दर्शनी भागात लावण्याच्या सुचना देण्यात आल्या. याव्यतिरीक्त प्रामुख्याने मुद्रा मधील शिशु योजनेत अधिक कर्ज वाटण्याचे तसेच  बॅकेच्या योजनांची माहिती हिंदी मध्ये तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे दिलेल्या सुचनांचे पालन झाले किंवा नाही हे बघण्यासाठी आपण अचानक सर्च करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


  • पिक कर्ज वेळेत द्या

दुष्काळी परीस्थितीमुळे शेतक-यांची आर्थीक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना वेळेत पिककर्ज देण्याचे निर्देश भावनाताई गवळी यांनी दिले.आतापर्यन्त 130 कोटीचे कर्ज वाटप झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली. जिल्हयात यावर्षी 2 हजार 78 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे टारगेट दिल्या गेले आहे. जिल्हयातील 1 कोटी 78 लाख 700 शेतकरी कर्जमाफीस पात्र झाल्याने त्यांना कर्ज मिळणार आहे. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post