कारेगाव (पारंबा) येथील वन व्यवस्थापन समितीस प्रथम पुरस्काराने सन्मानित



रफीक कनोजे
 झरी  :  झरीतालुका हा मागासलेला तालुका म्हणून प्रचलित असलेल्या या तालुक्यातील कारेगाव( पारंबा) येथील वन व्यवस्थापन समितीस सन 2017-18 या वर्षाचा  जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार मा पालकमंत्री मदानभाऊ येरावार याचे हस्ते वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्षमन धुर्वे  यास 51 हजार रुपये व प्रमानपत्र देण्यात आले. त्यावेळेस जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ प्रामुख्याने उपस्थित होते. जामनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारेगाव (पारंबा) या गावास संत तुकाराम योजने अंतर्गत सॅन 2017-18  या वर्षात वनरक्षन संवर्धन रोपवन कामे उत्कृष्ट काम केल्याबाबत यवतमाळ जिल्ह्यातुन संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारेगाव याची निवड करण्यात आली होती या समितीने वनांचे रक्षण श्रमदानातून वनराई बंधारा तयार करणे , बी लागवड  करणे,  जलसंधारण कामे करणे , कुऱ्हाड बंदी , चराई बंदी, ग्रामस्वच्छता  करणे अशा प्रकारचे निकष पूर्ण केल्याने  या समितीने तुकाराम वनग्राम योजने मध्ये भाग घेतला.  त्यावेळी तालुका स्तरीय मूल्यमापन होऊन  जिल्हा स्तरीय निवड समिती कडे प्रस्ताव पाठविण्यात आला व उपविभागीय अधीकारी भुवनेश्वरी ने या समीतीच्या कार्याची स्वतः पाहणी केली  त्या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पांढरकवडा, यवतमाळ, अकोला या वनविभामार्फत विविध वनव्यवस्थापन समिती ने  भाग घेतला व निवड समितीने मूल्यमापन केले  त्यात पांढरकवडा  विभागातील  जामनी वन  परीक्षेत्रातील  कारेगाव (पारंबा) या समितीस जिलास्तरीय प्रथम पुरस्कार 1मे चे औचित्य साधून देण्यात आला. त्या वेळेस के एम अभणा उपवनसंरक्षक पांढरकवडा वन विभागाचे  कु. व्ही पी वसव (थिगळे) सहाय्यक उपवन सरक्षक,  एस बी मेहेरे वन परीक्षेत्राधिकारी  जामनी व समितीचे सचिव दिपेश  लोखंडे याचे मार्गदर्शनात कामे करण्यात आले. वनरक्षक ए, व्ही राठोड वन विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रथम पुरस्कार मिळाल्याने गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post