मुंबई, दि. 6 : ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात श्री.दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः ‘..भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे
संगीत क्षेत्रातला 'शुक्र तारा' निखळला : ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाहिली श्रद्धांजली