- अंदाजे 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान
- सुदैवाने जीवित हानी टळली
तेल्हारा: शहरातील पोलीस स्टेशन समोरील दमयंती दूध डेअरीच्या वर प्रकाश कुलकर्णी यांच्या घराला शॉर्टसर्किट होऊन आज दुपारी अचानक आग लागल्यामुळे नागरिकांची पळापळ झाली परंतु नागरिकांच्या सतर्कतेने आग विझवण्यात यश आले. तेल्हारा शहरातील अग्निशमन पाचारण करण्यात आले होते परंतु शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे व एकीमुळे अग्निशामक येण्या अगोदरच आग विजवण्यात नागरिअकांना यश आले. लागलेल्या आगीत बरच आर्थिक नुकसान झाले यामध्ये घरातील जीवनोपयोगी वस्तूंसह रोख रक्कम व महत्वाचे कागदपत्रे जाळून खाक झाले परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. तरी प्रकाश कुलकर्णी यांनी हलाकीची परिस्थिती लक्षात घेता त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी नागरिकांचे मत आहे.
SHARE THIS