जनहित सामाजिक संस्थेकडून आलूर येथे स्वच्छता अभियान



चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) आज दि.13 मे रोजी आलूर येथे स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन माजी शिक्षक हणमंत भालके व रहेमान हाफीसाब यांच्या हस्ते करण्यात आले.
आलूर गावात 13 मे रोजी स्वच्छता मोहीम राबवावी अशी जनहित सामाजिक संस्थेकडून जाहीर करण्या आले होते. नियोजनानुसार आलूर येथे आज स्वच्छता मोहीम पार पडली. यामध्ये आलूरचे सुपुत्र तथा तुळजापूर येथे सामाजिक कार्य करणारे पंकज शंकरराव शहाणे व त्यांचे कुटुंब यांची उपस्थिती लाभली.
गावातील जनहित संस्थेचे सचिव संतोष कलशट्टी, महाराष्ट्र ओबीसी माळी समाज संघटनेचे उपाध्यक्ष संतोष भाकरे, नागेश पाटील, हनमंतप्पा शंके, परवेज सौदागर, बसवराज पांढरे, सैपन हाफीसाब, ऋषिकेश स्वामी, सागर शहाणे, चंद्रकांत शंके यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीमेला सुरुवात झाली.
महात्मा बसवेश्वर चौक, ग्रामपंचायत, लक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिर, ग्रामीण रूग्णालय, शिवाजी चौक मार्गे बस स्टँड पर्यंत एकूण चार तास सहा- सहा जणांच्या सात गटांनी हि स्वच्छता मोहीम यशस्वी केली. शेवटी हणमंत भालके यांनी स्वच्छतेचे महत्व याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे औचित्य साधून जनहित सामाजिक संस्थेचे सूचना फलकाचेही अनावरण करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेचे नियोजक संजय कासार यांनी केले होते, शेवटी निजाम हुच्चे यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post