![]() |
रफिक सिद्दीकी आणि फय्याज खान यांच्या खदान ग्रुपने केली शुद्ध पाण्याची तुरुंगात व्यवस्था
राधिका पाटील
अकोला दि.१४ : कडाक्याच्या उन्हात तुरुंगात अंगमेहनत करणारा बंदिवान हा सुद्धा माणूस असल्याची जाणीव ठेवत त्यांच्यासाठी राज्यात प्रथमच शीत आणि शुद्ध जल यंत्रणा अकोल्यात आज कार्यान्वित करण्यात आली आहे,एका छोटेखानी समारंभात ही यंत्रणा तुरुंगाला प्रदान करण्यात आली.
![]() |
माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी आणि फय्याज खान यांच्या खदान ग्रुपने अकोला कारागृहात आज सकाळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरुंगाधिकारी ज्ञानेशवर जाधव होते तर पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ,संतोष महल्ले,जावेद जकारिया ,पंकज जायले,जुबेर सिंघनिया,सय्यद वशीम,अहमद साहेब,अझीम साहेब,जे.के.मोसिन भाई ,फारूक इलेक्ट्रिशियन,फैसल अझीझी, मन्नान सिद्धीकी,मुरतुजा मुजाहिद ,नबाब अली,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
![]() |
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आर ओ आणि शितजल यंत्रणेचे उदघाटन करण्यात आले. रफिक सिद्धीकी आणि फय्याज खान यांनी दाखविलेल्या दातृत्वाचे अनेकांनी भाषणात कौतुक केले,डॉ.फडके,शेख युनूस,याकूब भाई,समीर अली,वसीम सिद्धीकी,कमर अली, मुकेश माळी,दीपक जूनगडे,अमोल इंगळे,उपस्थित होते ,कार्यक्रमाचे संचालन पंकज साबळे यांनी केले तर आभार दयानंद सरोटे यांनी मानले .
![]() |



