अतुल नवघरे
लाखपुरी :- १६ ,मुर्तिजापुर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र असलेल्या लाखपुरी येथे पूर्णा नदी आहे. पुर्णा नदी मध्ये अमरावती येथील अम्बा नाल्याचे पाणी तसेच किमीक्लस युक्त पाणी ,आजोबाजुतील घाण पुर्णा नंदी पात्रात आल्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरली होती. व संपुर्ण गावात खाज लागली आहे व पोटाचे विकार झाले आहे प्रशासनाचा व लोकप्रतिनीधीचा या गावाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे . त्यामुळे गावातील युवा वर्ग यांनी समोर येवुन पुढाकार घेवुन निर्णय घेतला गावतील युवा वर्गानी ठरविले की पुर्णा नदी स्वच्छ होत नाही तो पर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवण्याचे वचन घेतले बुधवारी सकाळी ७ वा. तिर्थ क्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थान मंदीर मंदीरात नारळ फोडले व पुर्णा स्वच्छतेचा शुंभारभ केला .आज पहिल्या दिवशी स्वच्छतेसाठी उपस्थीती मध्ये धर्मेंद्र चौहाण ,मंगलसिंग चौहाण ,निलेश ढाकरे ,आशिष कोकाटे,अतुल नवघरे ,अमोल व्यास ,सुनिल राऊत,मंगेश धानोरकर,सौरभ देशमुख ,अंबादास कुकडे,इत्यादीची उपस्थीती होती. उद्या पुर्णा स्वच्छेते मोहीमेचा २ रा दिवस असुन रोज सकाळी ७ ते ८.३० या दरम्यान श्रमदान केल्या जाईल. लाखपुरी करांनी व मुर्तिजापुर करांनी व अकोला करांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान लाखपुरी येथील युवकांनी केला आहे.
