संरक्षक मी या देशाचा
हाच मला अभिमान
स्वर्गाहून मज प्रिय वाटतो
भारत देश महान ...........
हाच मला अभिमान
स्वर्गाहून मज प्रिय वाटतो
भारत देश महान ...........
स्वातंत्र्याचे पईक आम्ही
शिमेवरती उभे ठाकतो
दहशतवादी गुंड मवाली
घुसखोराना रोखून धरतो
गस्त घालूनी शिस्त राखणे
कार्य आमुचे छान............
शिमेवरती उभे ठाकतो
दहशतवादी गुंड मवाली
घुसखोराना रोखून धरतो
गस्त घालूनी शिस्त राखणे
कार्य आमुचे छान............
देश हितास्तव सतर्क असतो
आनंदाने कष्ट झेलतो
संकट समई धाऊन जातो
विजया साठी कटतो मरतो
रणांगणावर तळपत जगणे
हाच आम्हा सन्मान .........
आनंदाने कष्ट झेलतो
संकट समई धाऊन जातो
विजया साठी कटतो मरतो
रणांगणावर तळपत जगणे
हाच आम्हा सन्मान .........
अन्यायाचे निर्दालन हे
कर्तव्याचे माप आमुच्या
तळहातावर मस्तक घेऊन
करतो गोष्टी देश हिताच्या
तन मन धन पण अर्पण करणे
हेच आम्हा वरदान...........
कर्तव्याचे माप आमुच्या
तळहातावर मस्तक घेऊन
करतो गोष्टी देश हिताच्या
तन मन धन पण अर्पण करणे
हेच आम्हा वरदान...........
शस्त्रास्त्रे तर जिवलग आमचे
देव मानतो आम्ही तयाना
देशाहून प्रिय नसते काही
हेच सांगतो खरे जगाला
भारत भू तर माता आपली
गावू तिचे गुणगान............
देव मानतो आम्ही तयाना
देशाहून प्रिय नसते काही
हेच सांगतो खरे जगाला
भारत भू तर माता आपली
गावू तिचे गुणगान............
थोर संस्कृती या देशाची
इथे जन्मन्या भाग्य लागते
परस्पराच्या सहकार्याने
देशाचे नंदनवन बनते
अबाधीत राखाया त्याला
करू आम्ही बलिदान.......
इथे जन्मन्या भाग्य लागते
परस्पराच्या सहकार्याने
देशाचे नंदनवन बनते
अबाधीत राखाया त्याला
करू आम्ही बलिदान.......
आज तिरंगा घेवून हाती
जगायचे तर अभिमानाने
इतिहासाला जोडायेची
नवी आणखी सुवर्ण पाने
सहकार्याचा हात सदा द्या
हेच तुम्हां आव्हान..........
जगायचे तर अभिमानाने
इतिहासाला जोडायेची
नवी आणखी सुवर्ण पाने
सहकार्याचा हात सदा द्या
हेच तुम्हां आव्हान..........
तुकाराम पाटील
पिंपरी पुणे१७
९०७५६३४८२४
