मोर्णाच्या विकासासाठी आमदार हरिष पिंपळे यांनी दिला रुपये एक लाखाचा धनादेश



अकोला :-  मूर्तिजापुरचे आमदार हरिष पिंपळे यांनी  मोर्णा नदीच्या विकासासाठी रुपये एक लाखाचा धनादेश आज  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात  सदर कार्यक्रम पार पडला. आमदारांनी दिलेल्या निधीचा विनीयोग मोर्णा नदी काठी सध्या सुरु असलेल्या विविध विकास कामांसाठी  केला जाणार आहे.
 जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय  यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला दि. 13 जानेवारीपासून प्रारंभ झाला.  सुमारे 14 टप्प्यात पार पडलेल्या या मोहिमेमुळे मोर्णाचा कायापालट झाला आहे.
लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी सढळ हाताने निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post