कालिंदनंदिनी​ राजयोग​


हळूच तू हसायचे ,दुरून मी बघायचे
तुझ्या समीप यायला मला कधी मिळायचे
नभात चंद्र यायचा,हसायचा रुसायचा
मनात चांदणे तुझ्या,कितीकदा फुलायचे
तुझ्याच अंगणात तू ,गुलाब वेच चांगले
मला गुलाब द्यायला,तुला कधी  कळायचे
तुझ्या घरा समोर मी , तुझीच बाग पाहतो
तुझ्या मिठीत यायला,
मला कधी  जमायचे
निघून वेळ चालली,तुझीच वाट पाहतो
अजून सांग तू तरी ,मला किती छळायचे
अशीच प्रेम वादळे ,विरून सर्व चालली
रुपास मी तुझ्या किती, मनो मनी जपायचे
तुझीच जन्म कुंडली , जुळून यायची मला
बघून राज योग का,हळू हळू हसायचे


तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post