इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- समाज विकास संस्था यांच्यावतीने भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल(लोहारा) यांना कार्यकर्ता गौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
समाज विकास संस्थेचे कार्यवाह भुमिपुत्र वाघ यांनी पत्रकार इकबाल मुल्ला यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे कि,आपण गेली अनेक वर्षापासुन सामाजिक कार्यात महिला,मुल व पाणी या विषयात जो योगदान दिलात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.या आपल्या कार्याची दखल घेवुन समाज विकास संस्थेनी आपली कै.मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार 2018 सालासाठी निवड केली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि.15 जुन रोजी उमरगा येथील वात्सल्य बालगृहाच्या सांस्कृतीक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व रोख एक हजार रुपये ठेवण्यात आले आहे.पत्रकार इकबाल मुल्ला यांना पुरस्कार जाहीर झाल्याने यांचे परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
