अतुल नवघरे
लाखपुरी:५ ,महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद (प्राथमिक विभाग )शाखा अकोला जिल्हाचा वर्षपूर्ती कार्यक्रम नुकताच दिनांक 30 एप्रिल 2018 रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन, अकोला येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय श्री. रणजीत पाटील यांचे हस्ते करण्यात आला. ह्या कार्यक्रमात पंचायत समिती मूर्तिजापूर येथील पारद शाळेला देणगी देणारे श्री प्रवीण ओंकारराव पानझाडे यांचा माननीय श्री.रणजीत पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी आपली मुलगी कु. आद्या प्रवीण पानझाडे हिचा पाचव्या वाढदिवसानिमित्त अवांतर खर्च न करता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, पारद डिजिटल करण्यासाठी 25 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
जिथे लोक आपल्या पारिवारिक कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करतात तिथे श्री.प्रवीण पानझाडे यांनी शाळेला केलेली ही मदत इतरांना प्रेरणा देणारी तसेच जिल्हा परिषद शाळांची गरज अधोरेखित करणारी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. विराेधी पक्ष नेते रमण जैन हे हाेते. उदघाटन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरिष पिंपळे व सौ.संध्याताई वाघोडे,जि.प.अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे, सत्पाल साेहळे, विलास बोबडे , प्रकाश चुनारकर ,डाॅ. अमाेल रावणकार, संदेश पालकर, विज्युक्टाचे विनाेद बाेर्डे, डाॅ. अमाेल रावणकार, अतुल काेल्हे, विलास ढाेबळे, डाॅ. अशाेक अाेळंबे, डाॅ. नरेश बजाज, डॉ घुगे , सारंग करे , राजकुमार बोनकिले, सुनिल पांडे राजेश वराेकार, सुनील पांडे, रणधिर पाटील, सुनील पाटील , श्याम कुलट, अादी उपस्थित हाेते. स्वागताध्यक्ष परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर हाेते.
कार्यक्रमाला शिक्षक परिषेचे पदाधिकारी मुरलीधर कुलट, अरूण वाघमारे, विश्वास पाेहरे, श्याम कुलट, सुनील मािणकराव, रवींद्र अवारे, अंजली मानकर, माे. वसिमाेद्दिन, चंद्रशेखर पेठे, गजानन लाेणकर, संताेष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, विजय धनाडे, गजानन काळे, संताेष इंगळे, अनिल भागरे, दिनेश भटकर, माेहसीन खान, अजय पाटील गाेठकडे, अमाेल कावरे यांच्यासह तालुका कार्यकारीणीतील पदाधिकारी विजय वाकाेडे, प्रशांत देशमुख, धर्मेंद्र चव्हाण, रुपेश सुर्यवंशी, विष्णु झामरे, रघुनाथ चव्हाण, गजानन शेवलकर, अरूण भराडी, मनाेज वाडकर, निलेश शेगाेकार, गजानन गाेतरकर, प्रशांत पुराणिक, सुभाष ढोकणे, डिगांबर खडसे आदींचा समावेश होता.
