खरीप हंगामाचा शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सन 2017 च्या खरीप हंगामाचा शेतकऱ्यांचा पिक विमा लवकर द्यावा,अशा मागणीचे निवेदन लोहारा शहरातील शेतकरी आयनोद्दीन सवार यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,या विम्याचे राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या हिस्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा केलेली असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत विमा वाटप झालेले नाही.

शेतकऱ्यांकडुन विमा भरुन घेताना तारीख निश्चीत केली जाते.पण शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याची रक्कम देताना मात्र वेळ तारीख ठरवली जात नाही.शेतकऱ्यांची विम्याची एवढी मोठी रक्कम एक महिना उशिरा दिली तर विमा कंपनीला या रक्कमेच्या व्याजापासुन मिळणारी रक्कम ही कंपनीला फार मोठी कमाई व फायदा मिळवुन देते.
शेतकरी कंगाल झाला तरी चालेल पण विमा कंपनी मालामाल झाली पाहीजे अशीच भावना यावरुन दिसते.कारण सद्यस्थितीला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही.आणि ज्या कोणी शेतकऱ्याने शासनाच्या खरेदी केंद्रावर माल घातला आहे.त्याचे ही पैसे अजुन शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.अशा आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीची पुढील वर्षाची मशागत बी— बियाणे लग्न कार्य इत्यादी अनेक आर्थिक अडचणी असल्याने 2017 चा खरीप विमा तात्काळ वाटप करण्याचा आदेश द्यावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर शेतकरी आयनोद्दीन सवार,सहदेव काडगावे,लहु शिंदे सोमनाथ भोजने,अदिंच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post