![]() |
तशा दरवर्षी सहन करण्याची वेळ येत असते.जणू पाणी टंचाई ही आमच्या नशिबाचाच भाग झाला आहे की काय ? असा प्रष्न उपस्थित होत आहे. परंतु महाराश्ट्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जमीयत उलेमाच्या वतीने तालुक्यातील आठ गावांना दि. 12 पासून पाच टॅंकरद्वारे घरपोच मोफत पाणी देण्याची व्यवस्था करून दिल्याने पाणी टंचाईच्या झळा सहन करणा-या गावक-यांना दिलासा मिळाला आहे.
जमीयत उलेमाचे राष्ट्रीय सचिव हजरत मौलाना सय्यद महमुद असद मदनी आणि महाराष्ट्राचेेेे अध्यक्ष मोैलाना हाफीज मोहम्मद नदीम सिदीकी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व विदर्भाचे जमियत उलेमाचे जनरल सचिव आणि राश्ट्रीय महामार्गावरील सोनोरी येथील दारूल उलूम वेलफेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुक्ती मो. रोशनशाह कासमी यांच्या महत्वपूर्ण सहकार्यातून पाच टॅंकर द्वारा आठ गावांना मोफत पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

