चंद्रपुर:(प्रतिनिधि)- संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागन्यासाठी, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनांच्या सूकाणु समितीने आक्रमक पवित्रा घेत. सरकारने सर्वच मागण्याबाबत शेतकऱ्याची फसवणुक करत, सुकाणु समितीने आज १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो सत्याग्रहाची हाक दिली; बेळगावासह राज्यातील ३७ जिल्ह्यामधे शेतकरी जागर यात्रा काढत, सुकाणु समितीने सरकारच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला आहे. वीज बिलावर बहिष्कार टाकत शेतकऱ्यानी अन्नत्याग आदोलन केले त्यानंतरही सरकारला जाग आलेली नसून, शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात सरकार धन्यता मानत आहे.
म्हनुणच आज १४ मे रोजी चंद्रपुर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आदोलन करून, जिल्हाधिकारी श्री. आशुतोष सलील यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले, यावेळी 'किसान पुत्र फाऊन्डेशन'चे प्रा. विजय बदखल, प्रा. रवि झाडे, 'धर्मराज्य पक्षा'चे जिल्हा समन्वयक प्रदीप उमरे, चेतन मडावी, किसान क्रांती समन्यवय समिती'चे जिल्हाध्यश प्रदीप बोबडे, 'आम आदमी पक्षा'चे भिवराज सोनी, सुनिल मुसडे, रामदास चौधरी, 'प्रहार'चे अरविंद वांढरे, 'शेतकरी सरक्षण समितीचे' महादेव चापले, आणि ईतर शेतकऱ्यासह किसानपुत्राची विशेष अशी उपस्थिती होती !

