जाहिरात
मुंबई : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दणदणीत पराभव करीत यशाचा झेंडा फडकविणारे शिवसेनेचे नवनिर्वाचीत आमदार विप्लव बाजोरिया यांचे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष कौतुक करीत पाठीवर शाबासकीची थाप दिली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तुम्हा पित्रा-पुत्रावर जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे अकोला, वाशिम, बुलडाण्यासह परभणी-हिंगोली मतदारसंघात पक्षसंघटन अधिक मजबुत करून विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, अशी सुचना उद्धव ठाकरे यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया व विप्लव बाजोरिया यांना केली.
जाहिरात
विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली मतदारसंघात विजयी पताका फडकविल्यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचीत आमदार विप्लव बाजोरिया यांनी वडिलांसमवेत शनिवारी " मातोश्री' वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार जयप्रकाश मुंदडा, परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय कदम, हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अकोला युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील युवासेना हिंगोली जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, युवासेना परभणी जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले निकेश गुप्ता, रवी धानुका, मुन्ना अग्रवाल उपस्थित होते.
या निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी विप्लव बाजोरिया यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेने नेहमीच युवाशक्तीला प्राधान्य दिले आहे. देशातील स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सर्वात युवा आमदार होण्याचा बहुमान विप्लव बाजोरिया यांना मिळाला असून हे यश शिवसेनेसाठी भुषणावह आहे.
जाहिरात
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात क्रमांक एक चा पक्ष शिवसेनाच ठरण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.आता तुम्हा पिता-पुत्राची जबाबदारी वाढली आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यासोबतच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक मजबुत करण्यासाठी आता जोमाने कामाला लागा. दोन्ही मतदारसंघावर बारकाईने लक्ष देऊन सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया पित्रा-पुत्रांना दिले.