जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा शहरातील नागरिकांना होणा-या वराहांच्या त्रासामुळे शहरवासिय हैराण झाले असून वराहांच्या या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यातच केरळमध्ये सद्या निपाह या भयंकर रोगाने उच्छाद घातला असून हा रोग वटवाघूळ व डुकरांच्या संपर्कात आल्यानंतर होतो असा निष्कर्ष वैज्ञानिकानी काढला असून या रोगावर कोणताही इलाज नाही.केरळ बरोबरच तेलंगणा राज्यातही हा रोग फैलावत असल्याने नागरिकांत मोठी भीती पसरली आहे.पण नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीे या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देत नसल्याने डुकराचा उपद्रव वाढला असून हजारो डुकरे शहरात मुक्तपणे संचार करीत असून पालिकेने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयातुन होत आहे.
जाहिरात
उमरगा शहरात आज सर्वात मोठी गंभीर समस्या उपद्रवी डुकर ठरत असून ही डुकरे शहरात सर्वत्र प्रचंड घाणी करीत आहेत.या डुकराचे मालक नागरिकांच्या त्रासाची व आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता डुकरे शहरात मोकळे सोडून देतात.तसे पाहता नगरपालिका हद्दीत अशाप्रकारे वराह पालन होत असेल व नागरिकांना त्याचा त्रास होत असेल तर तात्काळ बंदी घालता येते असा नियम आहे.पण पालिका प्रशासनाने कित्येक वेळा या डुकरांच्या मालकांना डुकरे पकडून घेऊन जा अन्यथा तुमच्यावर गुन्हे नोंदवू अश्या आशयाच्या नोटीसा काढलेल्या आहेत.पण मुजोर डुकरांच्या मालकाकडून या नोटीसीना केराची टोपली दाखविली जाते.तर पालिका प्रशासन ही तेवढ्या पुरतेच कारवाई दाखवीत असते व नंतर काहीही करीत नाही.वराह टोळ्यांच्या सांभाळ व खरेदी विक्री व्यवसाय शहरातील मसनजोगी वस्तीवर केला जातो.याबाबतची सर्व माहिती पालिकेला असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील सर्व भागात बेलगाम डुकरे फिरतात विशेष म्हणजे विदेशी जातीचे डुकरे असून त्यांचे वजनही प्रचंड आहेच पण प्रजनन ही मोठ्याप्रमाणावर करतात. या डुकरामुळे शहराच्या प्रत्येक भागात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे शहरवासियांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे तसेच अनेक जणांच्या मृत्यूचे कारण ठरलेला निपाह हा रोग डुकरे व वटवाघूळ यांच्यामुळे होत असल्याचे सिद्ध झाल्याने नागरिकांत प्रचंड घबराट उडाली असून शहरात जवळपास तीन ते चार हजार डुकरे असून या डुकरांच्या शहरवासीयांचे जगणे मुस्किल केले आहे. डुकरांच्या धास्तीमुळे नागरिकांना दिवसभर घरासमोर राखण करत बसून रहावे लागत आहे. यामुळे नागरिक,महिलांना मोठा मानसिक त्रास होत आहे. तसेच अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.या वराहांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनीे शहरात वराहांच्या पालनपोषणावर बंदी घालुन वराहांच्या तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.