आलुर येथे चक्री वादळाने एक म्हैश दगावली तर धाब्यावरील पत्रे उडाल्याने एक जण जख्मी

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उमरगा तालुक्यातील आलूर येथे दि.26 मे रोजी सायंकाळी चक्री वादळने थैमान घातल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडून शांतप्पा शरणप्पा समन यांची गाय दगावली तर शांतप्पा तावडे यांच्या धाब्यावरील पत्रे उडाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात

या वादळी वाऱ्याने धाब्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.तावडे याना  पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. तर सिध्दप्पा मल्लप्पा बोळदे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने 45 ते 50 पोते धान्याचे नुकसान झाले आहे.सन्नाटे विदूत ट्रांसफार्मर कोसळले आहे.

आलूर ते मुरूम मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद झाली होती ग्रामपंचायतने जे.सी.बी.लावून रस्ता खुला करून दिला.ज्योती तांडा,इंदिरा नगर व गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार माजले असून अनेक विदूत खांब पडल्यामुळे वीजपुरवठा बंद आहे.

जाहिरात

तलाठी दीपक चव्हाण व सुधाकर हळणुरे यांनी नुकसानीचे पंचनामे केले असून गावातील सर्वच नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत असून तसेच विद्युत पुरवठा लवकर सुरळीत करून चालू करण्यात यावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post