प्रतीक बोरकर, स्मिता मेघे कराटे चॅम्पियन विदर्भस्तरीय कराटे स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद



मकसूद अली 
यवतमाळ प्रतिनिधी : विदर्भस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलांमधून प्रतिक बोरकर , तर मुलींमधून स्मिता मेघे, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
    महाराष्ट्र राज्य ग्रामीाण पत्रकार संघ व येथील ऑल इंडिया सेवन ईगल मार्शल आर्ट कराटे असोसिएशनतर्फे दिनांक ६ मे  रविवार रोजी येथील नेहरु स्टेडियमवर विदर्भस्तीय कराटे चॅम्पियनशिप- २०१८ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विदर्भातील शेकडोंच्या संख्येत कराटेपटुंचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. मुलांमधून व्दितीय क्रमांक सतीश चव्हाण व तृतीय मनोज झाडे यांनी पटकाविला.


तर मुुलींमधून व्दितीय क्रमांक भुमिका गोळे व तृतीय ग्रायत्री अडेकर हिने मिळविला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्र्रामिण पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रविण रापर्तीवार यांनी केले.
    यावेळी डॉ.देवानंद तांडेकर,  प्रभाग आठच्या नगरसेविका पल्लवी रामटेके,  दैनिक सकाळचे जिल्हा बातमीदार राजकुमार भीतकर, कराटे प्रशिक्षक लेखा छत्रीय, रवी माळवी, विनोद पत्रे आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रमाची समाप्ती रात्री १० वाजता झाली. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मा.महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेष अलोणे, राज्य सचिव राजेश डांगटे, कार्याध्यक्ष अविनाश राठोड, विदर्भ अध्यक्ष प्रविण रापर्तीवार, कराटे प्रशिक्षक लेखा छत्रीय, नगर सेवीका पल्लवी रामटेके, डॉ.देवानंद तांडेकर,काका चावरे, रवी माळवी, विनोद पत्रे, क्रिष्णा चावरे, सुरेश राठोड, विजय पवार, महंमद नदीम, शहेजाद अली यांच्या हस्ते करण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेष अलोणे, राज्य सचिव राजेश डांगटे, कार्याध्यक्ष अविनाश राठोड, प्रविण रापर्तीवार, रवी माळवी, विनोद पत्रे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सेन्साई रमेश दांडेकर, सेन्साई अजय दांडेकर, संतोष ठाकुर, चेतन काणे, शोहेब अली, नवीन शहा आदींनी पुढाकार घेतला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post