जाहिरात
वास्को / मुंबई – गोवा जलमार्गावर सुमारे सत्तावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रवासी जहाज धावू लागले आहे. त्यामुळे दीर्घकालीन प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. काल, गुरूवारी सकाळी (दि. २४ मे, २०१८) *आंग्रिया सी ईगल प्रायव्हेट लि.* या कंपनीच्या *आंग्रिया* जहाजाचे गोव्यातील *मुरगाव* बंदरात दिमाखात आगमन झाले. मुरगाव पोर्ट स्ट्रटचे (एमपीटी) उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय व त्यांच्या अधिकाऱ्यांनी जहाजाचे, कंपनीचे अधिकारी,कर्मचारी व प्रवासी पाहुण्यांचे बंदरात स्वागत केले. यावेळी *आंग्रियाचे मालक कॅप्टन नितीन धोंड* उपस्थित होते.
साधारण सत्तावीस वर्षांपूर्वी गोवा ते मुंबई जलमार्गावर कोकण शक्ती आणि कोकण सेवक ही जहाजे प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध होती. या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र, कोकण रेल्वेच्या आगमनामुळे रेल्वे सेवेकडे वळलेले प्रवासी आणि अन्य काही कारणांमुळे ही सेवा खंडित झाल्यापासून नवीन जल सेवेची केवळ चर्चा आणि प्रतिक्षाच चाललेली होती.
जाहिरात
*‘आंग्रिया’ कंपनीच्या प्रयत्नांना वर्षभरात यश*
गेली बरीच वर्षे राज्य सरकार आणि मुरगाव बंदर पत्तन न्यास तसेच दृष्टी मरीन यांच्याकडून गोवा ते मुंबई जलमार्गावर पुन्हा एकदा पर्यटन विकासाच्या दृष्टीने क्रुझ पर्यटन जहाज सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, सरकार आणि एमपीटीच्या प्रयत्नांना अद्याप काही यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर *आंग्रिया सी ईगल प्रायव्हेट लि.* या कंपनीने वर्षभराच्या प्रयत्नांनंतर गोवा ते मुंबई जलमार्गावर प्रुझ पर्यटन जहाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यात यश मिळवले आहे.
*सागरी पर्यटनाला उभारी मिळणार*
आंग्रिया हे त्यांचे अद्ययावत आणि अलिशान जहाज काल, गुरूवारी सकाळी प्रवाशांना घेऊन गोव्यात दाखल झाले. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील माझगावच्या व्हिक्टोरीया डॉकच्या देशी पुझ धक्क्यावरून या जहाजाने आपल्या पहिल्या सागरी सरावाच्या सफरीला प्रारंभ केला होता.*डायरेक्टोरेट ऑफ शिपिंगकडून या जहाजाच्या सेवेला परवानगी मिळालेली आहे. सध्या मान्सूनपूर्व सफरीला परवानगी मिळालेली असली तरी या जलसफरीची खरी सुरुवात पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून होणार आहे.* या जलसेवेमुळे गोवा व कोंकण क्षेत्रातील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी सागरी पर्यटनाच्या उभारीसाठी या सेवेचा मोठा हातभार लागणार आहे.