तुम्हाला डॉक्टर व्हायचंय? डॉ.प्रवीण सिनगारे यांचे महत्त्वपूर्ण व्याख्यान

जाहिरात

इकबाल मुल्ला
 लोहारा/प्रतिनिधी :-वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि त्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींची माहिती देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.प्रवीण शिनगारे यांचे तुम्हाला डॉक्टर व्हायचंय? या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि.27 मे रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उस्मानाबाद येथे व्याख्यान होणार आहे.

जाहिरात
दहावी,अकरावी,बारावीत शिक्षण घेणार्‍या त्याचबरोबर नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर होणे हे स्वप्न असते.या स्वप्नाला मूर्तरूप देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यातील इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे.त्याकरिता डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याकरिता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण सिनगारे वैद्यकीय प्रवेशातील प्रक्रिया अगदी ओघवत्या भाषेत समजावून सांगणार आहेत.त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या व वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया समजून घेण्याची इच्छा बाळगणार्‍या विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क असल्याचेही संयोजकांनी कळविले आहे.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post