प्रवाश्याला लुटणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद



जाहिरात
   पूर्णा (राजेश वालकर) प्रवाशांना लूटून रेल्वे रोकून पळून जाणाऱ्या अट्ट्ल गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या सुरेश चोपडे या जवानाचा रेल्वे विभागाने पुरस्कार देवून गौरव केला .
        येथील रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात शुक्रवारी  विभागीय व्यवस्थापक त्रेकालज्ञ राभा व रेल्वे सुरक्षा बलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्तव्यदक्ष कॉंस्टेबल सुरेश शंकरराव चोपडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन अट्टल गुन्हेगारांना पकडल्याबद्द्ल रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरविले .१७ मे ला सचखंड एक्सप्रेस चुडावा रेल्वे स्थानका जवळ आली तेव्हा दोन अट्टल चोरांनी प्रवासी व्यापाऱ्यास लूटून त्याचे पैसे व मोबाईल लूटून घेतला व रेल्वेची चैन ओढून गाडी थांबवून आंधाराचा फायदा घेत पळ काढला .यावेळी चुडावा रेल्वे स्थानकावर सुरेश चोपडे हे कर्तव्य बजावत होते त्यांनी आरडाओरड ऐकून तात्काळ आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले यावेळी अन्य प्रवासीही त्यांच्या मदतीला धावले.सुरेश चोपडे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे व प्रसंगाधवनामुळे दोन अट्टल गुन्हेगार तावडीत सापडल्या बद्दल रेल्वे प्रशासनाने त्यांचा गौरव केला.त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक मुकेशकुमार मीना ,शेख जावेद ,विनोद पाटील यांनी केले आहे.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post