- कर्जमाफीच्या व्याप्तीत वाढ आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना योजनेची ९ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना केंद्र शासन २००८व राज्य शासन २००९ या वर्षाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही तसेच २२ सप्टेंबर २०१७ व १मार्च २०१८ ते २० मे २०१८ या वाढीव कालावधीमध्ये पात्र शेतकऱ्यांनी १एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीमधील कर्जाचा उल्लेख केला नसेल आणि आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज सादर केला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी १ एप्रिल २००१ ते ३१मार्च २००९ या कालावधीत ३०जून २०१६रोजी थकीत असलेले व ३१जुलै २०१७ पर्यंत बँकेत भरणा न केलेले पीक कर्ज/पुनर्गठीत व मध्यम मुदत कर्जाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर १ एप्रिल २००१ ते ३१मार्च २०१६ या कालावधीत वाटप केलेल्या इमूपालन, शेडनेट व पॉलिहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
जाहिरात
त्यानुसार जुन्या थकबाकीदारांनी यापूर्वी ऑनलाईन भरलेल्या त्यांचे अर्जामध्ये दुरूस्ती करुन तसेच ज्या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाची २००८ व राज्य शासनाची २००९ या वर्षामध्ये झालेल्या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या अशा नविन शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज आपले सेवा केंद्र/ ग्रामपंचायत सेवा केंद्रामार्फत किंवा राज्य शासनाचे www.csmssy.mahaonline.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर ५ जून २०१८ पर्यंत सादर करुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या व्याप्तीमध्ये वाढ झाल्यामुळे कर्जमाफीचा लाभ घ्यावा,असे आवाहन उस्मानाबादचे
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी केले आहे.
