जेवळी येथील बसवेश्वर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी 33 वर्षानंतर स्नेह मेळावा साजरा केला.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील श्री बसवेश्वर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तेहतीस वर्षांनंतर एकञित येवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत मोठ्या उत्साहात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा साजरा केला.
   श्री बसवेश्वर हायस्कूल जेवळी येथील 1985 या  दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि.5 मे रोजी घेण्यात आला.या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे उदघाटन म.नि.प्र गंगाधर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव भुसणे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव अॅड.प्रदिप पणुरे,उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे,खजिनदार गुरूलिगप्पा कानडे, संचालक बाळप्पा पाटील, रेवणसिद्ध हावळे, गौरीशंकर पणुरे,प्राचार्य बी.एम.येळमेली,अदि उपस्थित होते.यावेळी  या संपूर्ण बॅचच्या वतीने या बॅचला शिकवणाऱ्या सर्व गुरूवर्याचा सत्कार करण्यात आला.या बॅचच्या एकूण 88 पैकी 81 मुलं व 18 पैकी 18 मुलीची उपस्थिती होती.या बॅचचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर विराजमान झाले आहेत. ते सर्वजण आज 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकञित आले होते.मुलीना यांचा माञ खूपच आनंद वाटत होता.
   स्वातंत्र्य पूर्व काळातील या शिक्षण संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी विद्यार्थ्यांनी असा कार्यक्रम घडवून आणला होता.या मेळाव्याचे अनेकांनी कौतुक केलं.या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तेहवीस गुरूजणाचा गणेशची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.गुरूजणाचा सत्कार सोहळा सुरू असताना अनेक शालेय जीवनातील वेगवेगळ्या आठवणीनाही उजाळा दिला जात होता.त्यामुळे शिक्षक ही भारावून गेले होते.
   या कार्यक्रमास माजी प्राचार्य व्ही.आय.कोरे,बी. एल.कोरे,ए.डी.वाघमारे बी.एम.बिराजदार, मुख्याध्यापक वाय.एस.कांबळे,ए.डी.आरबळे, बसलिगप्पा चटगे बसाप्पा कोरे,मुरलिगीरी गोसावी, विजयबाई चनशेट्टी,एस.आर.कोरे,यांच्यासह माजी विद्यार्थी पंचायत समितीचे सदस्य व्यकंट कोरे,प्रा. गोविंद काळे,प्रा.दयानंद बिराजदार,माजी सरपंच दिलीप पाटील,पांडूरंग वाकडे,यांच्यासह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ माणिकशेट्टी यांनी केले तर आभार शिवशरण तांबडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी वैजीनाथ पाटील,संजय राजपूत,मारूती कटारे,व्यकंट घोडके,पंडीत कार्ले,दत्तात्रय क्षीरसागर,आर.डी. लामजणे,शिवा कोळी,अदिंनी परिश्रम घेतले.

माजी विद्यार्थी मेळावा घेण्यासाठी गेल्या एक वर्षापासून  हे काम हाती घेतलो होतो प्रत्येक मिञापर्यत पोहचायचे असा निश्चय मनाशी बाळगून प्रयत्न केला त्यामुळे    यशस्वी झालो.मुलीची शंभर टक्के उपस्थिती असल्याने हा मेळावा यशस्वी झाला याचे समाधान वाटते   शिवशरण तांबडे    माजी विद्यार्थी मेळावा प्रमुख यांनी केले.


 हा मेळावा होवू नये म्हणून चार दोन मिञानी विरोध केला त्याचे खूपच वाईट वाटले यांनी का विरोध केला हे माञ समजले नाही परंतु त्यानी विरोध केल्यानेच हा कार्यक्रम यशस्वी झाला भविष्यात शाळेसाठी चांगले उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले 
   वैजीनाथ पाटील 
      माजी विद्यार्थी 

या माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित राहणे शक्य नव्हते. पण वर्गमित्र आणि पुढाकार घेतलेल्यानी केलेली विनंतीवरून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. परंतु हे कार्यक्रम आणि तेहतीस वर्षांनंतर आम्ही सर्वजण एकञित भेटत आहोत यावरती विश्वासच बसत नव्हता.
    सुजाता चनशेट्टी, अनिता सोळसे 
       माजी विद्यार्थीनी

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post