जाहिरात
अकोला :- अकोल्यातील स्कायलार्क हॉटेल येथील रुम भाड्याने घेऊन, स्थानिक वर्तमान पत्रात आक्षेपार्ह जाहिराती देऊन , इलाजच्या नावाखाली पैसे उकळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पंडित ओमप्रकाश जोशी रा.हरिद्वार (उ.प्र.) वर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला च्या कार्यकर्त्यांकडून तक्रार करून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन ला जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.
जाहिरात
सदर भोंदू ज्योतिषी हा वंध्यत्व, मतिमंदत्व, कँसर सारख्या गंभीर शारीरिक व मानसिक आजारांवर मोठी रक्कम उकळून इलाज करण्याच्या नावाने फसवणूक करायचा. अशा आजारांवर इलाज करण्याचा दावा करणे, जाहिरात करणे किंवा त्याचा प्रचार प्रसार करणे हाच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा ठरतो.
जाहिरात
हा भोंदू ज्योतिषी मागील अनेक वर्षांपासून अकोलेकरांची फसवणूक करत होता. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच महानगर संघटक चंद्रकांत झटाले, युवा संघटक ऍड.अनिल लव्हाळे , ऍड.शेषराव गव्हाळे, हरीश आवारे, महिला संघटिक सौ.संध्याताई देशमुख यांनी त्या भोंदू ज्योतिषाचा पोलिसात तक्रार करत गुन्हे दाखल केलेत व भोंदूगिरीचा पर्दाफाश केला.

ज्या ज्योतिषाला आपल्यावर उद्या पोलिसात गुन्हे दाखल होणार याची माहिती नाही त्याच्यावर नागरिकांनी कितपत विश्वास ठेवावा? कुठेही अशा प्रकारची नागरिकांची फसवणूक होत असेल तर नागरिकांनी अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा... -चंद्रकांत झटाले, महानगर संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अकोला.