श्री. गाडगे महाराज महाविद्यालय मुर्तिजापूर (एच.एस.सि.व्हि.) निकालाची उज्वल परंपरा कायम.


 अतुल नवघरे
लाखपुरी:३१,येथील स्थानिक श्री. गाडगे महाराज महाविद्यालयातील एच. एस. सि. व्हि.  विभागाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल ८०% लागला आहे.

हितेश गडेकर हा ईलेक्ट्रिकल शाखेचा विद्यार्थी ८३.६९% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आलेला आहे. त्याला ईलेक्ट्रिकल वायरिंग या विषयात १०० पैकी ९८ गुण मिळाले. कु. ऋतुजा आठवले ८१.३६  % गुण मिळवून द्वितीय व ८०.९३ % गुण मिळवून विजय खंडारे  तृतीय आला. तसेच शिवानी बोबडे ७६.६१%, कु .राजेश्वरी नागे ७६.३०%,अनिकेत बोरेकर ७५.२३% कु. अंकिता साप्ते ७५% हे विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले.        

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब तिडके , सचिव श्री. शिरीषभाऊ तिडके, प्राचार्य श्री. संतोष ठाकरे व विभागप्रमुख श्री.महेंद्र कंकाळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post