उत्कृष्ठ कामगिरी बाबत तलाठी प्रदीप घाटोळ ला मा.पालक मंत्री रंजीत पाटिल यांच्या हस्ते प्रशस्ति पत्र देऊन गौरविन्यात आले



शफ़ी खान
कुरुम :- कुरुम येथील रहीवाशी तथा मूर्तिज़ापुर तहसील अंतर्गत ग्राम माना सर्कल मध्ये येत असलेला मौजा बोट्टा येथील कार्यरत तलाठी प्रदीप सूर्यकुमार घाटोळ यांना उत्कृष्ठ कामगिरी करन्याबाबत महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे नुकतेच प्रशस्ति पत्र देण्यात आले.सविस्तर माहिती अशी की, दिनांक 01 में 2018 रोजी अकोला येथील नियोजन सभागृह मध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात राज्यातिल जनतेच्या दृष्टितील अत्यंत महत्वाच्या गांव नमूना नं 7/12 संगनकी करनात,"ई फेरफार"मध्ये अचूक गांव नमूना नं 7/12 व गांव नमूना नं 8/अ साठी तलाठी प्रदीप घाटोळ यांनी आपले काम उत्कृष्टरित्या केले आहे. व "डिजिटल स्वाक्षरी" चा गांव नमूना 7/12 देण्याच्या कामातिल त्याच्या योगदाना  बद्दल त्यांना शासनाच्या महसूल विभाग तर्फे हे प्रशस्ति पत्र मा. रंजीत पाटिल पालक मंत्री अकोला यांच्या हस्ते देऊन गौरविन्यात आले.या वेळी अकोला येथील प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले व बरेच सम्बंदित अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post