इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- धर्मादाय संस्थेतंर्गत उमरगा-लोहारा तालुका सर्वधर्मिय धर्मादाय संस्था अंतर्गत विवाह समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील आहेत.या समितीचे उपाध्यक्ष लोहाराचे दिनकर जावळे पाटील,सदस्य म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार,जि.प.सभापती अभय चालुक्य,युवा नेते किरण गायकवाड,भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे,उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुलतान सेठ,गुंजोटीच्या श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दामोदर पतंगे,विधीज्ञ सेवा समितीचे अध्यक्ष अॅड.व्ही.एस.आळंगे,सचिव अॅड.उदय वैद्य आदिं आहेत.हा विवाह सोहळा सर्वधर्मिय असल्याने ज्या-त्या धर्माच्या रुढी-प्रथा,परंपरेनुसार संपन्न होणार आहे.वधुचे वय १८ तर वराचे वय २१असणे आवश्यक आहे.वधु आणि वर पक्षाची प्रत्येकी शंभर वऱ्हाडी मंडळी येणे अपेक्षित असून त्यांच्या नाष्टा व जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.या विवाह प्रसंगी वरास फेटा,सफारी ड्रेस,टॉवेल,सॉक्स,शुज तर वधुस मंगळसुत्र,जोडवे,साडी-चोळी,चुनरी,चप्पलसह संसार उपयोगी भेटवस्तु देण्यात येणार आहेत.हा विवाह बुधवार(ता.९)रोजी सायंकाळी ठीक ६.३३ मी.ने प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या क्रीडागंणावर होणार असून त्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज भरुन रुपये अकराशे अनामत भरणे गरजेचे आहे.सदर अनामत रक्कम लग्नादिवशी परत देण्यात येईल.या नोंदणीकरिता श्री माधवराव पाटील महाविद्यालय व प्रतिभा निकेतन विद्यालय,मुरुम,शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,लोहारा,श्री छत्रपती शिवाजी महाविघालय व आदर्श महाविद्यालय,उमरगा या ठिकाणच्या कार्यालयाशी संपर्क करावा.विवाह नोंदणीची अंतिम तारीख ५ मे असून जास्तीत-जास्त वर-वधुची नावनोंदणी व ज्यांना कुणाला या सोहळ्यामध्ये अर्थसहाय्य करावयाचे आहे त्यांनी समितीशी संपर्क करण्याचे आवाहन उमरगा-लोहारा सर्वधर्मिय धर्मादाय संस्था अंतर्गत सामुहिक समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील,उपाध्यक्ष दिनकर जावळे पाटील,सुरेश बिराजदार,अमोल मोरे,किरण गायकवाड,अभय चालुक्य आदिंनी केले आहे.
