ग्रामीण क्षेत्रातील प्रतीभावंतांना संधी उपलब्ध करून देणारा प्रकाशवाट पथदर्शी प्रकल्प - प्रा. शरद पाटील



  • मुर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील 90 विद्यार्थ्यांची निवड 


मुर्तिजापूर (प्रतिनीधी) ग्रामीण भागात प्रतिभावंत आणि होतकरू यांची कमतरता नाही. परंतु त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन  उपलब्ध होत नसल्याने शहरी भागाच्या तुलनेत ते मागे पडतात. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याकरीता जनमंच नागपूर द्वारा लहानसा पथदर्षी प्रकल्प म्हणजे प्रकाशवाट आहे.

विदर्भातील ग्रामीण भागातील विद्य्याथ्र्यांसाठी निशूल्क मार्गदर्शन आणि 10 वी च्या विद्याथ्र्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान विषयात ते मागे राहू नये म्हणून तज्ञ शिक्षकांच्या मदतीने त्यांना मार्गदर्षन करण्यात येणार आहे.


या करीता विदर्भात मुर्तिजापूर येथून या प्रकल्पाला सुरूवात करण्यात येत आहे. या करीता ग्रामीण भागातील 9 वी पास झालेले व शाळेतून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले एकुण 90 विद्याथ्र्यांची निवड करण्यात आलेली आहे. या करीता प्रत्येक विषयाचे 10 तज्ञ शीक्षक विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या विद्याथ्र्यांना शैक्षणीक साहीत्य देखील पुरवील्या जाणार आहे. मुर्तिजापूर येथील सर्वांनी पाठबळ दिल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढच्या वर्षी विदर्भातील प्रत्येक जिल्हातील एका तालुक्यात प्रकाशवाट प्रकल्प सुरू करण्यात येईल. त्या नंतर विदर्भातील प्रत्येक जिल्हातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामीण विद्याथ्र्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आणि शहरी व ग्रामीण दरम्यान वाढत चाललेली शैक्षणीक दरी कमी करून ग्रामीण क्षेत्रातील विद्याथ्र्यांना बरोबरीने आणण्याचा प्रयत्न या प्रकल्पातुन केला जाणार आहे.

असे प्रतिपादन नागपूर जनमंच द्वारा भारतीय ज्ञानपीठ येथे आयोजीत प्रकाशवाट प्रकल्पाच्या उदघाटन समारंभा प्रसंगी बोलतांना नागपूर जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केले.

या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून भारतीय ज्ञानपीठचे प्राचार्य विकास सावरकर हे होते. तर विशेेष अतिथी म्हणून भा.प्र.से. निति पाथोडे (आय ए एस) तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभात किडसचे गजानन नारे, अमितभाउ पावडे, उपाध्यक्ष जनमंच, प्रा. राजा आकाश, हरीभाउ पाथोडे, प्रा. सुधाकर गौरखेडे यांची उपस्थिती होती. या संमारंभाला

नागपूर येथून राम आखरे, श्री खरासने, श्री झोडे, श्री राठोड, श्री उत्तमराव सुळके, श्री खोरगडे, श्री जावळकर, श्री जगताप, प्रशांत कळनावत, श्रीकांत दोड, अकोल्याचे श्री प्रनाटे सर, अॅड. अनिल किलोट, प्रा. प्रतापसींग पाटील, रमेशचंद्र कुर्मी, अरूण बोंडे, उद्यागपती कैलास अग्रवाल, श्री विजय सोमाणी, अॅड. अविन अग्रवाल, डाॅ. बायस्कार, डाॅ. मुरळ, नासीर सर, प्रशांत हजारी यांची उपस्थिती होती. प्रास्तवीकातुन या प्रकल्पाची भूमिका जनमंच अमित पावडे यांनी मांडली. उपस्थित मान्यवरंाचे स्वागत पुस्तक व गुलाब पुश्प देवून करण्यात आले. या वेळी गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांच्या शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.


निवड करण्यात आलेल्या विद्याथ्र्यांना सतत मार्गदर्शन  तज्ञ शिक्षकांकडून केले जाणार आहे. या समारंभाचे बहारदार संचालन अली सर यांनी केले. तर आभार प्रा. गौरखेडे यांनी व्यक्त केले. सदर प्रकल्पातुन प्रा. राजा आकाश हे दर रविवारी विद्याथ्र्यांना

भवितव्य मार्गदर्षन व आत्मविष्वास आदि बाबींवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन  करणार आहेत.या वेळी राजू वानखडे, मधुकर इंगोले, भटकरताई, संतोष पाठक, जया टाले, उमेश वर्गे, सेवकराम लहाणे, बांबल सर,ज्ञानेष्वर टाले, विनोद देवके, शैलष संगमवार, संकेत सावरकर, गोपाल वानखडे, चंदन अग्रवाल, यासह सर्व तज्ञ षिक्षक, पालकवर्ग, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. सदर प्रषिक्षण भारतीय ज्ञानपीठ येथे सकाळी साडे दहा ते सायंकाळी चार वाजे पर्यंत जवळ पास दीड महिना सुरू राहील. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post