दि पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनची​ ​विभागीय कार्यकारिणी जाहीर.


  • ​नागपूर विभागीय अध्यक्षपदी​ ​प्राचार्य विश्वपाल हजारे​ तर 
  • ​अमरावती विभागीय अध्यक्षपदी​ प्रा.अजय देशपांडे यांनी निवड.


  विशेष प्रतिनिधी,
​नागपूर/अमरावती : दि. पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार मा.श्री. किशोरजी आबिटकर यांच्या आदेशान्वये व मीडिया ग्रुपचे सचिव मा.अनिलराव कदम यांच्या नेतृत्वात तसेच मा.मीडिया ग्रुपच्या महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ कांचनताई जांबोटी-नाईक, उपाध्यक्ष मा.श्री.एम.डी. चव्हाण, कार्याध्यक्ष मा.श्री.तानाजीराव  जाधव, सदस्य मा.श्री.ईश्वरजी हुलवान, मा.ताजुद्दीनजी शेख, मा.श्री.कुलभूषण महाजन, मा.श्री.मधुकरजी गलांडे, मा.श्री.राजेशजी जवंजाळ, मा.श्री.संदीप बाजड, मा.श्री.आशुतोष इंगळे, मा.श्री.अजिंक्य गोवेकर, मा.श्री.गजानन गवई, मा.श्री.निलेश धाडीकर, मा.श्री.ऋषीकेश वाघमारे यांच्या शिफारसी वरून दि. पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदी दैनिक सकाळ व तरुणभारत भंडारा जिल्ह्याचे विशेष प्रतिनिधी मा.श्री. प्राचार्य विश्वपालजी हजारे, तर विभागीय संघटक पदी दैनिक दिव्यमराठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.आशिषजी एस.पावडे, विभागीय सचिव पदी आयबीएम टीव्ही-९ वृत्तवाहिनीचे विदर्भ ब्युरो चीफ व विदर्भ नागपूरचे रहिवाशी मा.श्री.भीमरावजी महादेवराव लोणारे, तसेच विभागीय संपर्क प्रमुख पदी लाईव्ह चंद्रपूर वृत्तवाहिनी व महाव्हाईस वेब पोर्टल वृत्तवाहिनीचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.मिलिंदजी खोंड तसेच विभागीय मुख्य सल्लागार पदी लाईव्ह चंद्रपूर वृत्तवाहिनीचे संपादक मा.श्री. प्रवीणजी गोंगले व दैनिक सकाळ सावली, गोंदिया जिल्ह्याचे विशेष प्रतिनिधी मा.श्री.देवेंद्र रामटेके यांची एकमताने निवड करण्यात आली, त्याचबरोबर ऋतूगंधा मासिकाचे संपादक, साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार मा.श्री.प्रा.अजयजी देशपांडे यांची अमरावती विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, तसेच Ntv व MH माझा न्यूज मराठी, न्यू इंडिया टाईम्स वेब पोर्टलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.मकसूदभाई अली यांची विभागीय संघटक पदी तर टीव्ही-९ न्यूज वृत्तवाहिनीचे अकोला जिल्हा प्रतिनिधी मा.श्री. गणेशजी सोनोने यांची विभागीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून विभागीय संपर्क प्रमुख पदी दैनिक नवाकाळ व लार्ड बुद्धा वृत्तवाहिनीने वाशीम जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.अजयजी ढवळे यांची तर अमरावती विभागीय मुख्य सल्लागार पदी आजतक वृत्तवाहिनी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.जका खान साहब यांच्यासह वरील समस्त पदाधिकारी यांची नियुक्ती मीडिया ग्रुप कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन जाहीर केल्याची माहिती राज्याचे संपर्क प्रमुख मा.श्री.आशुभाऊ इंगळे (गुरुजी) यांनी दिली आहे.​
  ​नागपूर व अमरावती विभागात दि पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन संघटनेच्या निवडीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ही पत्रकारांची संघटना भविष्यात कुठले पाऊल उचलणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे, यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.​

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post