- अ.भा. ग्राहक पंचायत द्वारा श्रद्धांजली
मक़सूद अली
यवतमाळ. स्व.बिंदु माधव जोशी(नाना) संस्थापक अध्यक्ष अ.भा. ग्राहक पं. यांचा स्मृती दिन ग्राहक पंचायत कार्यालय दत्त चौक येथे 10 मे 2018 रोजी संध्या. 7.30 वा. साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्व. बिंदू माधव जोशी यांच्या फोटोला जेष्ठ सदस्य चंद्रकांत गड्डमवार यांनी पुष्पहार घातला. सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी ग्राहक पंचायत यवतमाळ चे अध्यक्ष अॅड राजेश पोहरे सचिव राजू कठाले जिल्हा कार्यकारणी सदस्य अनंत भिसे, कार्यालय प्रमुख प्रकाश चनेवार, प्रसिद्धी प्रमुख शेखर बंड, सदस्य प्रा.हरीश धुर्वे उपस्थित होते.
