जागतिक परिचारिका दिन साजरा


मक़सूद अली 
यवतमाल :- जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी कार्यालयात  जागतिक परिचारिका दिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला . 12 मे हा फलोरेन्‍स नाईटेंगल याचां जन्‍म दिवस असून त्‍या जगविख्‍यात परिचारीका होत्‍या त्‍यानी युध्‍दातील जखमी सैनिकाची भरपुर सुश्रुशा केली व त्‍याचे प्राण वाचविले व त्‍या काळात मॉर्डन नर्सीगं स्‍कूल ची स्‍थापना केली या कार्यामुळे जगभरात फलोरेन्‍स नाईटेगंल याचां जन्‍म दिवस जागतिक परिचारिका दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात येतो .


कार्यक्रमाला अध्‍यक्ष म्‍हाणुन जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य सभापती नंदीनीताई दरणे होत्‍या तर जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ डी.जी.चव्‍हाण,डॉ पी.एस.चव्‍हाण,डॉ एस.ढोले,डॉ कोषटवार,डॉ दुधे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्‍यक्षीय भाषणात नंदीणी दरणे म्‍हणाल्‍या आरोग्‍य सेवेतील कर्मचा-यावर कामाचा भरपुर ताण असला तरी आपण प्रत्‍येक रूग्‍णाला सहयार्दपुर्ण वागणुक दिली पाहीजे व त्‍याचें सपुंर्ण समाधान केले पाहीजे.जिल्‍हा आ‍रोग्‍य अधिकारी यानी या प्रसंगी ए.एन.एम व एल.एच.व्‍ही याच्‍यां अडचणी जाणुन घेवून येत्‍या काळात सर्व समस्‍या सोडवण्‍याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रशांत पाटील यानी केली . या प्रसंगी आरोग्‍य सेवेत कार्यरत ए.एन.एम व एल.एच.व्‍ही यानी लसीकरण,कुटंब कल्‍याण कार्यक्रम,गरोधर माता व बालके याना वेळीच सेवा देउन मातामृत्‍यु व बालमृत्‍यु घटविण्‍याचे उल्‍लेखनिय कार्य केल्‍या बददल प्रत्‍येक तालुक्‍यातीन एक ए.एन.एम व एक एल.एच.व्‍ही याचां प्रमाण पञ देउन गौरव करण्‍यात आला .कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीते करीता एन.व्‍ही.नवाडे, व्हि.बी.वाईकर, एस.एम.मेश्राम यानी परिश्रम घेतले .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post