अतुल नवघरे
लाखपुरी:१ ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला जिल्हा चे वतीने जिल्हा मेळावा तथा संघटनेचा वर्षपुर्ती सोहळा सोमवार दि. ३० एप्रिल राेजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. विराेधी पक्ष नेते रमण जैन हे हाेते. उद्घाटक राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा मा. ना. डॉ. रणजितजी पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. संध्याताई वाघोडे, अध्यक्षा जि. प. अकोला, आमदार हरिष पिंपळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष ( प्राथमिक विभाग) राजेशजी सुर्वे, डॉ.सतपाल साेहळे, विलास बोबडे , प्रकाश चुनारकर ,डाॅ. अमाेल रावणकार, विजूक्टा अध्यक्ष अविनाशजी बाेर्डे, डाॅ. अमाेल रावणकार, अतुल काेल्हे, डाॅ. अशाेक अाेळंबे, डाॅ. नरेश बजाज, मा. सारंग करे , राजकुमार बोनकिले, सुनिल पांडे
राजेश वराेकार, सुनील पांडे, सुनील पाटील , अादी उपस्थित हाेते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकार चतरकर यांनी तर संचालन नितीन बंडावार यांनी केले. अाभार सचिन काठाेळे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक परिषेचे पदाधिकारी मुरलीधर कुलट, अरूण वाघमारे, िवश्वास पाेहरे, श्याम कुलट, सुनील मािणकराव, रवींद्र अवारे, अंजली मानकर, माे. वसिमाेद्दिन, चंद्रशेखर पेठे, गजानन लाेणकर, संताेष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, िवजय धनाडे, गजानन काळे, संताेष इंगळे, अनिल भागरे, िदनेश भटकर, माेहसीन खान, अजय पाटील गाेठकडे, अमाेल कावरे यांच्यासह तालुका कार्यकारीणीतील पदाधिकारी िवजय वाकाेडे, प्रशांत देशमुख, धर्मेंद्र चव्हाण, रुपेश सुर्यवंशी, िवष्णु झामरे, रघुनाथ चव्हाण, गजानन शेवलकर, अरूण भराडी, मनाेज वाडकर, निलेश शेगाेकार, गजानन गाेतरकर, प्रशांत पुराणिक, सुभाष ढाेकणे, डिगांबर खडसे अादींचा समावेश हाेता.याप्रसंगी अनेक शिक्षक-शिक्षिकांनी शिक्षक परिषदेत जाहीर प्रवेश घेतला.
याप्रसंगी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तिंचा सत्कार करण्यात अाला. शाळेत डिजिटल क्लास रुमची उभारणी करणे, शाळेसाठी स्वमालकिची जमीन देऊन बांधकामासाठी िनधीही देणे, िवद्यार्थ्यांना पाण्यासाठी समर्सिबल पंप व जलकुंभ बांधून देणे, शाळेत िवद्यार्थ्यांसाठी डाइनिंग टेबलसह भोजन कक्ष बांधून देणे अादी कार्य त्यांनी केले. त्यामुळे सामाजिक भान जपणाऱ्या दानशूरांचा सत्कार करण्यात अाला. यात अण्णासाहेब गणपतराव इंगळे (चांगेफळ ता. अकोला ) नामदेवराव नानोटे व हिम्मतराव नानोटे (निंभारा ता. बार्शिटाकळी), अविनाश नाकट( तांदळी ता. पातूर,) लोणकरन ग्वालदासजी डागा (दिनोडा ता. अकोट), प्रविण ओंकारराव पानझाडे(पारद ता. मूर्तिजापूर), उमेश गजानन घाटोळ ( बटवाडी ता. बाळापूर ) बेनिप्रसादजी झुनझुनवाला (दहीगाव अवताडे ता. तेल्हारा)राजेश वाघोडे, तेल्हारा यांचा समावेश हाेता. शिक्षण क्षेत्राचा नावलाैकिक वाढवण्याचे कार्य केलेले शिक्षक व स्पर्धांसह इतरही परिक्षेत यश मिळवलेल्या शिक्षकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात अाला. यात अंकुश गजानन काळे (अारबीअायमध्ये सहा. व्यवस्थापक), निखिल संताेष महल्ले (बंॅक अाॅफ इंडियात अधिकारी ), दर्शना अनिल भाकरे (चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले),शिक्षण क्षेत्रात आपल्या बहुमुल्य कामगीरी साठी संताेष झामरे, प्रिती इंगळे, प्रणिता इंगळे, विमल डोंगरे, अमोल गोंडचवर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास मालाेकार, एकनाथ खंडारे,विठ्ठलराव वैतकार ,अशोक मोुडोकार, यांचा सत्कार करण्यात आला
इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत असतानाही काही मराठी शाळांनी आपल्या कार्यातून वेगळेपण जपले आहे. अशा शाळांचा गौरवही मेळाव्यात करण्यात अाला. यामधे अकोला शहरातील बाल शिवाजी शाळा, पातूर तालुक्यात दुर्गम भागातील अंधार सांगवी येथील िजल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा यांचा विशेष गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात अाला. अत्यंत कमी साधन संपत्ति जिल्ह्यातील विध्यार्थांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणार्या छत्रपति शिवाजी शुटींग रेंज चे संचालक श्री विन्सेंट अमेर यांचाही सत्कार करण्यात आला
याप्रसंगी शिक्षक परिषदेमधे जिल्ह्यातील 101 शिक्षक बांधवांनी जाहीर प्रवेश घेतला
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन केले होते तेंव्हा शिक्षकांसोबत भोजन करतांना मा.ना.डॉ.रणजीतजी पाटील
