इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील समता नगर मध्ये बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने आरटीओ निरीक्षकपदी निवड झालेल्या महादेव कांबळे यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
न्यू प्रेरणा विचार मंचच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभीजीत कांबळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण माटे,प्रशांत माटे,महेश गायकवाड,बालाजी कांबळे,अदि उपस्थित होते. उमरगा तालुक्यातील एकुरगा येथील महादेव संभाजी कांबळे या युवकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत शिक्षण पूर्ण केले.त्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या परीक्षेत सहाय्यक मोठा वाहन निरीक्षक पदी निवड झाली आहे.महादेवचे वडील आजही खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत आहेत.एस.सी.या प्रवर्गातून तो राज्यात सतरावा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशात मिञाचा फार मोठा सहकार्य असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
समता नगर मध्ये बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून त्याच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी राम कांबळे,लक्ष्मण गवळी,संतोष कांबळे, संतोष तावसे,चंद्रकांत घोडके,लक्ष्मण कांबळे,सागर गायकवाड,अमित डोबे,दत्ता घोडके,कृष्णा कांबळे, अंकुश बोदाडे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत माटे यांनी मानले.
