- धनगर समाजाचा सत्ता संपादन निधौर महामेळावा
जाहिरात
मुतिजापुर प्रतिनिधी :- गेल्या 70 वषौपासून प्रसथापितांनी धनगर समाजाची फसवणूक झाली असून बहूजन समाजाची, भटक्या विमुक्त समाजातील सर्व घटकांची ही फसवणूक झाली या जातींना सत्तेत वाटा मिळाला नाही, म्हणून बहूजन समाजाचा सत्तेत सहभाग वाढविण्याचा आता निधौर केला आहे सवै बहूजन समाजातील समाज बांधवांनी आमच्या हिताचे, फायद्याचे कोण, आमचे मित्र कोण .
जाहिरात
हे सर्व ओळखून त्यांना साथ दिली पाहिजे सत्तेत जाण्याच्या लढाईचे नेतृत्व मोठा भाऊ म्हणून धनगर समाजाने करावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. पंढरपूर येथे आयोजित सत्ता संपादन निधौर महामेळावा ला प्रमुख पाहुणे म्हणून अँड बाळासाहेब आंबेडकर धनगर समाज बांधवांना मागैदशैन करताना बोलत होते ते म्हणाले की बलूतेदारांनी सरकार समोर आपल्या समस्या मांडण्यासाठी कितीदिवस आंदोलने करावी लागणार आहे, मात्र धनगरांना सत्ताधारी बसविण्यासाठी आपण लढाई सुरू केली आहे.
या लढाईचे नेतृत्व धनगर समाजाने मोठा भाऊ म्हणून करावे असा सल्ला देण्यात आला राज्यातील दलित, ओबीसी, भटके विमुक्त समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही शिकारीची तयारी केली आहे मात्र शिकार अघाप ठरवला नाही. आमच्या हातून बारामती, मुंबई, आणि नागपूर पैकी कोणीही शिकार होवू शकतो असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना -भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आजपयैत सत्ताधा-यांनी दोन समाजात भांडणे लावण्याच्या पलीकडे काहीही केले नाही.
जाहिरात
धनगर, मराठा, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती मध्ये तेल ओतण्याचे काम सत्ताधा-यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे धाबे दणाणले आहेत पंढरपूर येथील टिळक स्मारक या खुल्या मैदानावर सभेला सुरूवात झाली.
या मेळाव्याला उपस्थित मा. आ. हरिदास भदे, अर्जुन सलगर नवनाथ पडाळकर मारूती जानकर अमोल पांढरे मा. आ. विजय मोरे बापू हटकर डॉ यशपाल भिंगे बळीरामजी चिकटे अँड दिलीप एडतकर काशीरामभाऊ साबळे डॉ शशिकांत तरिंगे गोपालभाऊ कोल्हे सभामंडपावर उपस्थित होते, यांनी सभेला संबोधित केले या सभेचे सूत्रसंचालन प्रा एल डी सरोदे मातृभूमी पत्रकार यांनी व्यक्त केले आणि प्रास्ताविक अर्जून सलगर यांनी व्यक्त केले आभार मारोती जानकर यांनी व्यक्त केले सभेला राज्यभरातून लाखो समाज बांधवांची उपस्थिती लावली होती. सभा संपन्न झाली. असे प्रा एल डी सरोदे मातृभूमी पत्रकार मुर्तीजापूर यांनी लेखी निवेदन देऊन प्रसिद्ध केले
