- यौगिक शेतीचे मार्गदर्शन
रिसोड :- महेंद्रकुमार महाजन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोड,क्रुषी विज्ञान केंद्र करडा व अम्रूता शेतकरी मंडळ रिठद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन दि२८मे सोमवारला संत गजानन महराज सभागृह रिठद ता रिसोड येथे सायंकाळी ४ वाजता केले आहे.
जाहिरात
मेळाव्याचे उदघाटक मा.लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हाधिकारी वाशिम,अध्यक्षा राजयोगीनी ब्रह्माकुमारी रूख्मिनि दीदी अकोला , प्रमुख मार्गदर्शक महेंद्रभाई ठाकूर मनेजिंग डाइरेक्टर रुबी बायोकेमिकल मुंबई , प्रमुख अतिथि
राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदीजी (कामठी)नागपूर, राजयोगिनी ब्रह्माकुमारी रेखा दीदीजी उमरेड,डॉ रवींद्र काळे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ क्रुषी विज्ञान केंद्र करडा,दत्तात्रयजी गावसाने जिल्हा अधीक्षक क्रुषी अधिकारी वाशिम,कु अनीसा महाबळे प्रकल्प संचालक आत्मा वाशिम,राजयोगी ब्र.कु विजयभाई अकोला,राजयोगीनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदीजी संचालिका रिसोड इत्यादी मान्यवर उपस्थित रहणार आहेत.
जाहिरात
यौगिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भौतिक,सामजिक व मानसिक जीवनमान उंचविन्यासाठि मार्गदर्शन करणे व स्वर्णिम भारताच्या निर्मितीसाठी शेतीची उत्पादन क्षमता वाढवून गुणात्मक अन्नधान्य निर्माण करणे हा मेळाव्याच्या मुख्यउद्देश आहे.
जाहिरात
प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय च्या ग्रामविकास शाखेच्या वतीने योगिक शेती मार्गदर्शन अभियान राबविण्यात येत आहे या मेळाव्याचा लाभ रिसोड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेऊन यौगिक शेतीला प्राधान्यक्रम देण्यासाठी रिठद येथील शेतकरी सशक्तीकरण मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मा कुमारी ज्योती दीदीनी व के व्ही के प्रमुख डॉ रवींद्र काळे यांनी केले आहे.
