मधापुरी सरपंचास शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल


शफी खान 
कुरूम : गोरा कोंडवाड्यातुन सोडण्याचे कारणावरून वाद करून मधापुरी येथिल सरपंच यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना  आज गुरूवार दि.३ मे ला सायंकाळी ६ वाजता ग्राम मधापुरी येथे घडली.
        प्राप्त माहितीवरून गैर अर्जदार भैयालाल रामचरण श्रीवास वय ५५ वर्ष रा.मधापुरी यांनी अर्जदार सरपंच प्रदिप हरिदास ठाकरे यांना गोरा कोंडवाड्यातुन सोडण्याचे कारणावरून वाद करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
         याप्रकरणी पो.स्टे.माना येथे प्रदिप ठाकरे यांच्या तक्रारीवरून गैर अर्जदार भैयालाल श्रीवास विरोधात कलम ५०४,५०६ दाखल झाला असून पुढिल तपास पो.हे.काँ.नंदकिशोर टिकार करित आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post