यवतमाळ :- शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रेसर लॉयनेस क्लब यवतमाळच्या वतीने 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोसोळी पोट येथे वॉटरकुलर आरो सिस्टीम सह गुणवंत फार्म अमरावती स्व. गुणवंतराव देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ तसेच श्रीमती विमलाबाई पारसमलजी तातेड यांच्या स्मृति प्रित्यर्थ फिटींग सह पाण्याची टाकी लॉयनेस सौ. संतोष तातेड यांच्या तर्फे देण्यात आले. या कार्यक्रमाच्या लोकापर्णन सोहळा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीस लायनेस अध्यक्षा सौ. उषा राजु मुंदाने तर प्रमुख पाहुणे म्हणून केन्द्र प्रमुख सुदर्शन थोटे, डायट यवतमाळचे प्राचार्य प्रशांत गावंडे, लॉयन्स क्लब अध्यक्ष छोटुभाई खेतानी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शालीनी वाडे, शिक्षीका स्नेहा खोंडे,भुतपूर्व प्रांताअध्यक्षा सौ. सुधा राठी, उप प्रातांध्यक्षा सौ. निलीमा मंत्री, लॉयन्य सहसचिव राजु मुंदाने, लॉयन संतोष तातेड, लॉयन सौ. खेतानी, सौ. सविता अग्रवाल, सुप्रिया उत्तरवार, सौ. आशा पाठक, सौ. कविता कोठारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित्त होते.
शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध व्हावे विद्यार्थ्यांची आरोग्य सुदूढ व्हावे या उदात्त हेतूने लायनेस क्लब यवतमाळच्या वतीने वॉटरकुलर प्युरिङ्गायर ही दिलेली भेट ही प्रेरणादायी राहील. असे मत केंद्र प्रमुख श्री सुदर्शन थोटे यांनी व्यक्त केले. तर प्राचार्य प्रशांत गावंडे यांनी लायनेस क्लबच्या या उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंशा करुन ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये राबविलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ. सौ. प्रिती माकडे यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सौ. रेखा खडतरे यांनी केले.
