इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे आपला उमेदवारी अर्ज गुरूवार दि. 3 मे रोजी उस्मानाबाद येथे ना. पंकजाताई मुंडे, ना संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आहेत.
बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.), रयतक्रांती संघटना, जनस्वराज्य पार्टी या महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे आज उस्मनाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई मुंडे, कौशल्य विकास व भुकंप पुनर्वसन मंत्री ना. संभाजी पाटील निलंंगेकर यांच्यासह महायुतीचे नेते यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उस्मनाबाद-लातूर-बीड जिल्ह्यातील महायुतीमधील पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सकाळी आकरा वाजता शुभमंगल कार्यालय, तेरणा कॉलेजजवळ, बायपास रोड, उस्मनाबाद येथे उपस्थितीत राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.
