- रक्तदान शिबीराला शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
मक़सूद अली
प्रतिनिधी यवतमाळ :- सेवा कुठलीही असो, शिवसैनिक रक्ताचे पाणी करुन सेवा देतात. आजच्या रक्तदान शिबीरात सुध्दा मोठया प्रमाणात रक्तदानासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे शहरात निर्माण झालेल्या अभूतपुर्व अशा पाणी टंचाईत सुध्दा शिवसैनिक जीवाचे राण करुन पाण्याचा पुरवठा करीत आहे. मुळात शिवसैनिकांच्या रक्तातच सेवेची भावना असल्याचे हे द्योतक आहे, असे प्रतिपादन खासदार भावनाताई गवळी यांनी केले. त्या यवतमाळ जिल्हा शिवसेना तसेच राजे संभाजी ग्राम विकास बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्धाटन कार्यक्रमात बोलत होत्या. जिल्हयातील आरोग्य, रस्ते तसेच पाण्याच्या प्रश्नाला आपण अग्रक्रम देणार आहो. केंन्द्र सरकारच्या मदतीने यवतमाळच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्या जात आहे.अमृत योजनेसाठी 150 कोटीचा निधी केंन्द्र सरकारने दिला आहे. त्यामुळे भविष्यात यवतमाळकरांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार असल्याचे भावनाताई गवळी यांनी सांगीतले. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हयातून गोरगरीब जनता उपचारासाठी येत असते.अशा गरजूंना वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टर, आरोग्य कर्मचा-यांचे सुध्दा त्यांनी कौतुक केले. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या वतीने 28 टॅंकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. संपुर्ण उन्हाळयात ही जलसेवा सुरुच ठेवणार असल्याचे माजी आमदार शिवसेना नेते बाळासाहेब मुनगिनवार यांनी सांगीतले. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंन्द्र गायकवाड यांनी रोज 8 हजार लिटर पाणी रुग्णालयाला देण्याची घोषणा केली. शहरात सुध्दा पाण्याचा पुरवठा सतत सुरु राहावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगीतले. शिवसेना 80 टक्के समाजकारण तसेच 20 टक्के राजकारण करीत असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे कार्य बघता ते शंभर टक्के समाजकारण करीत असल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी केले. 1 मे ला गोखी धरणाचे पाणी यवतमाळकरांना उपलब्ध करुन देऊ असे वचन आपण जनतेला दिले होते. त्या अनुषंगाने आपण ते कार्य पुर्ण केले आहे. मात्र काही सत्ताधारी या कामाचे सुध्दा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका कांचनताई चौधरी यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी पंधरा हजार रक्ताच्या बॉटल्सची गरज पडते. अशावेळी रक्तदानात सुध्दा शिवसेनाच आघाडीवर राहत असल्याचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी सांगीतले. शिवसेनेच्या वतीने आतापर्यन्त लाखो लिटर पाण्याचे वाटप करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, जिल्हाप्रमुख महिला लताताई चंदेल, निवासी उपजिल्हाप्रमुख
प्रविण पांडे, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, गजानन डोमाळे, उमाकांत पापीणवार, आशिष खुलसंगे, किशोर इंगळे, संजय रंगे,
प्रविण निमोदीया, शहर प्रमुख नितीन बांगर, सुजीत मुनगीनवार,राजु नागरगोजे, राजेश मेहरे, गोलु जोमदे, अनिल यादव, सचिन चव्हाण वैदयकीय महाविद्यालयाच्या अधिक्षका डॉ स्नेहलता हिंगवे, डॉ विकास येडशीकर, डॉ गुजर, चौधरी मॅडम, जानकर इत्यादी उपस्थित होते. सेंच्युरी पुर्ण करणार
मागील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार संतोष ढवळे हे फक्त बाराशे मताने पराभूत झाले होते.ते आपल्या विजयाची सेंच्युरी पुर्ण करु शकले नाही. त्यांची राहीलेली ही सेंच्युरी मी तसेच यवतमाळची शिवसेनेची पदाधिकारी मंडळी पुर्ण करुन देतील, अशी ग्वाही याप्रसंगी भावनाताई गवळी यांनी दिली.रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद शिबीरात रक्तदान करण्यासाठी जिल्हाभरातून मोठया प्रमाणात शिवसैनिक यवतमाळात आले होते. सकाळी दहा वाजता सुरु झालेले रक्तदान शिबीर सायंकाळी पाच वाजता संपले यामध्ये 285 शिवसैनिकांनी रक्तदान केले. खासदार भावनाताई गवळी दुपारी अकरा वाजतापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यन्त रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत होत्या.
