ग्रा.प जितापुर खेडकर येथे दि. १५ मे रोजी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात अंतर्गत तपासणी पथकाची ग्रामपंचायत जितापुर येथे भेट



अतुल नवघरे              
लाखपुरी:ग्रामपंचायत जितापुर खेडकर येथे दि. 15 मे  रोजी  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात अंतर्गत तपासणी पथकाची ग्रामपंचायत जितापुर खेडकर येथे तपासणी करण्यात आली आहे. या पथकामध्ये ,श्री घुगे साहेब विस्तार अधिकारी ( पंचायत ) पंचायत समिती अकोट ,श्री चतरकर साहेब गट समन्वयक पंचायत समिती अकोट ,श्री कीर्तने साहेब विस्तार अधिकारी (पंचायत ) पंचायत समिती मुर्तिजापूर  श्री वजीरे साहेब समूह समन्वयक पंचायत समिती मुर्तिजापूर ,व इतर त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ही तपासणीची टीम गावमधे उपस्थित झाली तेंव्हा,ग्रामपंचायत चे सरपंच जिवन ढोकणे,सदस्य अश्विनी उमाळे,अजय शेंडे,मेघा ढोकणे व गावातील प्रतिष्ठित नागरीक,विलासपाटील खेडकर ,राजेश उमाळे, प्रल्हाद इंगळे, प्रविण खेडकर,शेख वहीद, दिपक घोडेस्वार,तायडे बाळकृष्ण ननिर, रविंद्र निकम  यादि नागरीक व बहुसंख्येने महिलावर्ग व युवा टीमने उपस्थित राहुन त्यांचे उत्साहाने स्वागत केले.या प्रसंगी ग्रामपंचायत मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सुरवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले व नंतर आलेल्या सर्व मान्यवर टीमचे ,ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व गावातील नागरिकांनी स्वागत केले व नंतर कार्यक्रमाला रितसर  सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या अश्विनी उमाळे यांनी केले तर प्रास्ताविक सचिव संदिप गाडेकर यांनी केले,त्यानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान टिम प्रमुख श्री घुगेसाहेब विस्तार अधिकारी अकोट पंचायत समिती ,श्री चतरकरसाहेब गटसमनवयक अकोट,श्री कीर्तने साहेब,विस्तार अधिकारी पंचायत समिती मुर्तिजापुर, व वजिरे साहेब यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून गावची तपासणी करण्यात आली .याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच जिवन ढोकणे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचे धेय डोळ्यासमोर ठेवून येत्या काही काळात गावाला इतरांठी रोल माँडेल बनविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे . याप्रसंगी गावातील बहुसंख्येने लोक उपस्थित होते.हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवा टीमने त्यामध्ये उमेश खेडकर,पंकज बोळे,बबलु निकम ,शुभम नाकट चेतन नाकट  सुनिल तायडे, देवांनद तायडे हरिदास खेडकर सचिन डोंगरे निलेश घोडेस्वार या शिवाय बरेच मुलांनी परिश्रम घेतले.  शेवटी या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवरांचे,गावकरी बांधवांचे,युवा टीमचे सरपंच यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सागता करण्यााा आली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post