जाहिरात
"इंदिरा आवसमध्ये जास्त प्रमाणात गोर गरीब जनता राहते येथे कोणत्याही प्रकारची मुलभूत सुविधा व समाजमंदिराचे काम हे चांगल्या प्रकारे होवो. व गोर गरीब जनतेला मुलभूत सुविधा मिळाव्या. सुधाकर गावंडे सामाजिक कार्यकर्ता
तेल्हारा : येथील इंदिरा आवास मधील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे दुरुस्तीचे काम काही दिसंपासून सुरु आहे. काम सुरु असतांना न.प. विरोधी पक्ष नेता मितेश मल्ल, शिवसेना उपशहर प्रमुख निलेश मुर्हेकर, न.प.सदस्य गोवर्धन पोहरकार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गावंडे, व काही नागरिक सुरु असलेल्या समाज मंदिराच्या कामाची पाहणी करायला गेले असता, त्या कामावर न प चे कर्मचारी हजर नसून स्वतः ठेकेदारचे मानस समाज मंदिरामध्ये फरशी बसवत होते. त्या फरशीच्या खाली चांगल्या प्रकारची रेती न वापरता माल्ब्याची भारती टाकून थातूर मातुर काम चालू असल्याचे चित्र होते. यावेळी मितेश मल्ल, निलेश मुर्हेकर, गोवर्धन पोहरकर, सुधाकर गावंडे यांनी संबंधित अधिकार्यंना भ्रमणध्वनीद्वारे इंदिरा आवास येथी समाजमंदिराचे काम अंदाजपत्रकानुसार नसून निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे सांगितले. तर संबंधित अधिकारी यांनी ठेकेदारांना अंदाजपत्रकानुसार काम करा अन्यथा काम बंद करा अशा प्रकारची ताकीद देता ठेकेदाराने काम बंद केले.
जाहिरात
" गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये अशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकानुसार स्वतः हजर राहून काम करून घ्याव." मितेश मल्ल विरोधी पक्ष नेता न.प. तेल्हारा
"समाज मंदिराचे काम अंदाजपत्रकानुसार न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल." निलेश मुऱ्हेकर
"इंदिरा आवसमध्ये जास्त प्रमाणात गोर गरीब जनता राहते येथे कोणत्याही प्रकारची मुलभूत सुविधा व समाजमंदिराचे काम हे चांगल्या प्रकारे होवो. व गोर गरीब जनतेला मुलभूत सुविधा मिळाव्या. सुधाकर गावंडे सामाजिक कार्यकर्ता
" काम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याने काम बंद करण्यात आले. ठेकेदाराकडून काम अंदाजपत्रकानुसारच करून घेण्यात येईल. पांडुरंग राठोड न.प अभियंता, तेल्हारा
