उस्मानाबाद मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये मनसेचा राडा


जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मनसेचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथील बहुतांश जिल्हा कार्यालयाचे मुख्यालय असलेल्या मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्यै दि.23 मे रोजी दुपारी इंग्रजी पाट्या काढुन मराठी पाट्या लावुन धडाकेबाज आंदोलन केले.


यावेळी जिल्हा जलसंवर्धन अधिकारी,जिल्हा सांखीकी अधिकारी,भुजल सर्वेक्षण अधिकारी,नगर रचनाकार अधिकारी,दुय्यम निबंधक उस्मानाबाद,
यांच्यासह अनेक कार्यालयातील इंग्रजी पाट्या सबंधीत अधिकाऱ्यांनाच स्वत:च्या हाताने काढायला लावुन त्या पाट्या मनसेकडुन जप्त करण्यात आल्या.
जाहिरात


जाहिरात
व सबंधीत अधिकाऱ्यांना यापुढे इंग्रजीचा वापर कोठेही शासकीय कामात न करण्याची तंबी देण्यात आली.मनसेच्या या दणक्याने मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post