तळेगाव बाजार येथे श्री रामदेवजी बाबा भव्य संगीतमय विशाल जम्मा जागरण



जितेश कारीया
हिवरखेड - येथून  जवळच असलेल्या तळेगाव बाजार येथील श्री मनसा माता मंदिर प्रांगण, रुनीचा धाम, येथे दिनांक २० मे २०१८ रविवार रोजी श्री रामदेवजी बाबा यांचा संगीतमय विशाल जम्मा जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रामदेव बाबा यांचे संगीतमय भजन व कथा विदर्भाचे सुप्रसिद्ध भजन गायक धामणगाव रेल्वे येथील चंद्रकांत तिवारी यांचे मधुर वाणीने सर्व तळेगाव परिसर रामदेवबाबा यांचे भक्तीमय रसात रंगणार आहेत.

       चंद्रकांत तिवारी यांचे सुमधूर वाणीतून राणी सती माता, खाटु शामजी,हनुमानजी यांचे भजन व संकीर्तन ची प्रस्तुती अखंड ज्योती,श्रुंगार, छप्पन भोग लावून करण्यांत येणार आहे. रामदेव बाबा यांच्या भजन व जम्मा जागरणाच्या भक्तीरसात रंगल्या करिता सर्व बाबा भक्तांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन  महेश शर्मा, गिरीश शर्मा तसेच रामदेव बाबा सेवा मंडळ तळेगाव बाजार,आडगाव बुजुर्ग,हिवरखेड, दानापूर, तेल्हारा, अकोट, यांनी केले आहे.जम्मा जागरण कार्यक्रमासाठी पांढरी येथील महंत श्री नरेश बाबा,वारी भैरवगड येथील महंत श्री कृष्णानंदजी भारती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post