मुरुम पोलीसांना छापा मारुन 12 हजार रुपयाची हातभट्टी दारु नष्ट केली


 इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम पोलीसांनी धडाडीने दि.19 मे रोजी सकाळी चिंचोली परिसरात हातभट्टी दारुवर छापा टाकुन कार्यवाही केली आहे.या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे वाल्यांचे दाबे दणाणले आहेत.

या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख,पोलीस कर्मचारी महाबोले,नितीन गुंडाळे,महेश अवचार,अंजुम शेख यांनी चिंचोली शिवारातील हातभट्टी दारुवर छापा टाकुन कायदेशीर कार्यवाही केली आहे.


यावेळी पोलीसांनी 12 हजार रुपयाची रसायन व हातभट्टी साहीत्य जाग्यावरच नष्ट करुन टाकले.आरोपी मैनाबाई प्रेमनाथ राठोड रा.हनुमान नगर झोपडपट्टी या फरार झाल्या आहेत.
याच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post