- अकोट न.पा.मधील अधिकत्तम अधिकारी रजेवर न.पा.प्रशासन वार्यावर हे चित्र दिसत आहे.
जाहिरात
अकोट नगर परिषद ही अकोला जिल्ह्यातील प्रशासकीय दृष्ट्या सर्वात मोठी नगर परिषद म्हणून ख्यात आहे पण आज रोजी आठवड्याच्या कामकाजाचा पहिला दिवस असतांना एकही जबाबदार अधिकारी हजर नाही.नागरिकांचे प्रशासकीय कामे होत नाहीत ही शहरातील नागरिकांकरिता फार मोठी शोकांतिका आहे.अकोट शहरात पाणी टंचाई भीषण असुन अनेक प्रभागांत कुपनलिका बंद पडलेल्या आहेत याबाबत पाणीपुरवठा सभापती मनिष भाऊ कराळे यांनी व प्रामुख्याने नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,नगरसेवक विवेक बोचे,दिनेश घोडेस्वार,अजहर भाई,जितु जेस्वाणी,नुराभाई,यांनी प्रभागांप्रमाणे आढावा घेतला पण न.पा.प्रशासन गंभीर नसल्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.याबाबत न.पा.प्रशासन मनमानी विरोधात मनिष भाऊ कराळे यांनी तिव्र नाराज व्यक्त करत प्रशासकीय ढेपाळलेला कारभार सुधारा अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देवु व होणारे नुकसानास न.पा.प्रशासन जबबाबदार राहिल असा इशारा न.पा.प्रशासनाला कराळे यांनी दिला
